Girl's scooty video : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video)होत असतात . मीडियावर मुलींचे स्कूटी किंवा कार चालवतानाचे अनेक व्हिडिओ व्
Girl’s scooty video : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video)होत असतात . मीडियावर मुलींचे स्कूटी किंवा कार चालवतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात त्यांच्याकडून अनेकवेळा अशा देखील चुका होतात की त्यांना ट्रोल केलं जातं. ही चूक म्हणजे पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न असो किंवा कोणालातरी गाडी ठोकण्याचा व्हिडिओ असो, यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चाललेली असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी सिग्नलला स्कुटी थांबवण्याच्या नादात तोल गमावते आणि थेट बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन पडते.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका चौकात ट्रॅफिक सिग्नल लाल असल्याने सर्व दुचाकीस्वार एकाच सिग्नलवर उभे असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात मागून एक स्कूटी चालवणारी मुलगीही येते आणि ब्रेक लावून स्कूटी पायाने थांबवण्याचा प्रयत्न करते. शेवटी ती मुलगी स्कूटी थांबवते आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या मागे उभी राहते, पण स्कूटी थांबवताना तिचा तोल जातो आणि ती थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या नाल्यात पडते.
Caption please..#viralvideo #scooty #papakipari #Funnyvideo #trending pic.twitter.com/20qjZWELUv
— SuVidha (@IamSuVidha) November 18, 2022
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत उभे असलेले लोकांना सुरुवातीला काय झाले हे लगेच समजले नाही, पण नंतर त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना मुलगी पडल्याचे समजले. काही काळासाठी नंतर मुलीला तेथून बाहेर काढून घरी नेण्यात आले. या व्हिडिओवर युजर्स तरुणीला ट्रोल करत आहेत.
COMMENTS