हसण्यासाठी जोक्स | Jokes for laughs

HomeJoke

हसण्यासाठी जोक्स | Jokes for laughs

my-portfolio

हसण्याने माणसाचे जीवनमान वाढते. व्यक्तीला दिवसभर आलेला थकवा घालवायचा असेल तर दिवसातुन एखदा तरी हसले (Jokes for laughs) पाहिजे. पेशंट – डॉक्टर जोक

Viral Joke: पप्पू म्हणतो – पप्पा मला रोज मारतात मॅडम…

हसण्याने माणसाचे जीवनमान वाढते. व्यक्तीला दिवसभर आलेला थकवा घालवायचा असेल तर दिवसातुन एखदा तरी हसले (Jokes for laughs) पाहिजे.

पेशंट – डॉक्टर जोक

पेशंट – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,

झोपून उठल्यावर झोप येत नाही ,

काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल

सलमान खान गेला मुलगी बघायला

सलमान खान गेला मुलगी बघायला

55 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो…

त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते..

शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं..

तर म्हणाली..

“अग 30 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता..

“मला पास व्हायचंय” जोक

“मला पास व्हायचंय” जोक

एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,

“मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे..”

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : ..!!

प्रोफेसर : बघ बरं…पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील?

मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन

आहे..

.

.

.

प्रोफेसर : ठीक आहे मग.. “अभ्यास कर”….!!

“पोरगा रडतोय” जोक

“पोरगा रडतोय” जोक

एका बाई ने

येणाऱ्या बसला थांबवले …

.

Driver : कुठे जाणार ..?

.

.

बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय

जरा पोमपोम वाजवून दाखवा की …..!!!!!!!!

“काकांची तहान “ जोक

“काकांची तहान “ जोक

रस्त्यात एक मुलगी बेशुद्ध 😞होऊन पडली….गर्दी जमली…त्या गर्दीतून एक वयस्कर काका म्हणाले

“अरे जा..जा कुणी लिंबू सोडा घेऊन या”

एक तरुण मुलगा धावला आणि 20 रुपये  खर्च करून लिंबू सोडा घेऊन काकांच्या हातात दिला

काकांनी तो सोडा घटाघटा पिऊन टाकला आणि म्हणाले मलाच उशीर पासून तहान लागली होती.

“जशास तसे” जोक

“जशास तसे” जोक

एका मुलाने लायब्ररीतल्या एका मुलीला विचारलं, “मी तुझ्या शेजारी बसलो तर तुझी काही हरकत आहे काय?”

मुलीने मोठ्याने उत्तर दिले,

“मला तुझ्याबरोबर रात्र घालवायची नाही.”

लायब्ररीतले सर्व विद्यार्थी त्या मुलाकडे पाहू लागले. त्याला स्वतःची भयंकर लाज वाटली.

काही मिनिटांनंतर ती मुलगी शांतपणे त्या मुलाच्या टेबलाकडे गेली आणि म्हणाली,.

“मी मानसशास्त्राचा अभ्यास करते आणि मला माहित आहे की एक पुरुष कसा विचार करीत असतो. माझी खात्री आहे माझ्या उत्तरानं तुला स्वतःचीच लाज वाटत असेल!”

पुणेरी जोक

पुणेरी जोक

एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला

मुलगी – बावळट ब्रेक नाही का मारता येत

मुलगा (पुणेरी उत्तर) – अख्खी सायकल मारली

आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?

पुणेरी दानशूरता जोक

पुणेरी दानशूरता जोक

स्थळ सदशिव पेठ

बाबा – अंगणात कुत्रा आलेला आहे त्याला एक पोळी आण

चिरंजीव – पोळी शिल्लक नाही

बाबा –  मग तक दांडके आण आपल्या दारातुन कोणी काही खाल्याशिवाय परतलं नाही पाहिजे

इंजीनियर जोक

इंजीनियर जोक

इंजिनिअरींग कॉलेज मधे तोंडी परिक्षा चालु असते,

पहिला मुलगा आत जातो

शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला

गरम व्हायला लागले तर तू काय करशीला

विद्यार्थी – मी पंखा लावीन

शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर

विद्यार्थी- मी खिडकी उघडले

शिक्षक-  उत्तम आता मला सांग रेल्वे ८० कि मी  प्रति तासाने जात आहे तसेच खिडकीची लांबी आणि रुंदी २×२ आहे

तर डबा थंड होण्यासाठी किती वेळ लागेल

विद्यार्थीला उत्तर येत नाही व त्याला बाहेर जायला सांगतात

दुसरा विद्यार्थी येतो

शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला

गरम व्हायला लागले तर तू काय करशीला

दुसरा विद्यार्थी – मी पंखा लावीन

शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर

दुसरा विद्यार्थी- मी शर्ट काढीण

शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकाडा खुप आहे

दुसरा विद्यार्थी- मी पॅन्ट पण काढेण

शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकडुन मरेल इतकी गरमी आहे

दुसरा विद्यार्थी- मी उकडुन मेलो तरी चालेल पण खिडकी नाही उघडणार.

jokes

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0