Electric Bike : सोशल मीडियावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच गाड्यांच्या संदर्भातले व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोला कि
Electric Bike : सोशल मीडियावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच गाड्यांच्या संदर्भातले व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोला किंवा व्हिडिओला लाखो मध्ये व्ह्यू मिळतात. आनंदा महिंद्रा यांनी आता पर्यंत अनेक स्वयंस्फुर्तीने स्वता तयार केलेल्या गाड्यांच्या मालकांना अनेक बक्शिशे दिली आहेत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शेअर केलेला अनोख्या बाईकचा व्हिडिओ आज पहाणार आहोत.
आता जो व्हिडिओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पोस्ट केलेला आहे तो आहे ६ लोक बसून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक बाइकचा. एका सर्वसामान्य घरातील तरुणांनी सामान्य वस्तू पासून इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे, ज्यावर एक दोन नव्हे तर सहा व्यक्ती बसून प्रवास करू शकतात. त्या बाईक वरती सहा व्यक्तींना बसण्यासाठी सीट सुद्धा तयार केले आहेत. ही बाईक एकदा चार्जिंग केली असता साधारण 150 km पर्यंत जाऊ शकते.
बाईकची वैशिष्ट्ये:
ही बाईक बनवण्यासाठी साधारण १० ते १२ फूट लांबीचे लोखंडी पाईप वापरलेले आहेत आणि या पाईपच्या मदतीने या बाईकची फ्रेम तयार केलेली आहे. प्रवाशांना बसण्यासाठी सीट तयार केलेले असून त्यांना धरण्यासाठी हँडल सुद्धा बनवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये सहा व्यक्ती प्रवास करत असलेले आपणाला दिसत आहे.
With just small design inputs, (cylindrical sections for the chassis @BosePratap ?) this device could find global application. As a tour ‘bus’ in crowded European tourist centres? I’m always impressed by rural transport innovations, where necessity is the mother of invention. pic.twitter.com/yoibxXa8mx
— anand mahindra (@anandmahindra) December 1, 2022
ज्या तरुणांनी ही बाईक तयार केली आहे त्या तरुणाने सांगितले आहे की साधारण ही बाईक १० ते १२ हजार रुपयांमध्ये तयार केलेली आहे. ही कार एकदा चार्जिंग करून म्हणजेच ८ ते १० रुपये खर्च करून सहा जणांना 150 किमी पर्यंतचा प्रवास करून घेऊन जाऊ शकते. म्हणजेच साधारण दीड ते दोन रुपयांमध्ये एक व्यक्ती 150 किमी प्रवास करू शकते.
COMMENTS