King Kobra Viral Video: साप जरी म्हटलं की अंगावरती काटा येतो असे सापाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. साप पाहून एक धडकीच भरत असते. अ
King Kobra Viral Video: साप जरी म्हटलं की अंगावरती काटा येतो असे सापाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. साप पाहून एक धडकीच भरत असते. अशा भीती वाटणाऱ्या सापांचे व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ नेटकर्यांच लक्ष वेधून घेत आहे. एका घराच्या स्वयंपाक घरात एक किंग कोब्रा घरात घुसल्याने घरातील सर्वांची तारांबळ उडालेली आहे. स्वयंपाक घरात टेबलाखाली जाऊन बसलेला किंग कोब्रा बाहेर काढणे कठीण होते. अशा वेळेला घरातील सर्व सदस्य घराबाहेर पळून जातात आणि सर्प मित्राला बोलवून घेतात.
साधारण 36 सेकंदाचा हा व्हिडिओ “Now This” नावाच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ थायलंड मधील असल्याचे सांगणार आहे सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राची कसरत पाहून अंगावर काटा येत आहे. सर्पमित्राने स्टिकने पकडून स्वयंपाक घरातून बाहेर आलेला साप पुन्हा सुटतो व सरपत्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण सर्पमित्र त्याच्या कलीने त्या सापाला पकडतो.
Watch as snake catchers try to coax a 10-ft-long king cobra out of a family’s kitchen in Thailand. The family was inside the house when the giant snake entered, causing them to flea the premises & alert animal officials. Specialists were able to safely corral the cobra. pic.twitter.com/qqEQ8nAMDN
— NowThis (@nowthisnews) January 19, 2022
या व्हिडिओ ला आलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. तसेच काही युजर्सनी म्हटले आहे की जर तो साप चावला असता तर कायमचे जगच सोडून जावे लागले असते. दुसरा एका युजरने म्हटले आहे की ‘किती मोठा आहे हा साप, खरंच नुसता व्हिडिओ पाहून सुद्धा भीती वाटते.’
COMMENTS