चंद्र ग्रहण 8 नोव्हेंबर 2022 जाणून घ्या अचूक वेळ व माहिती | Know Lunar Eclipse 8th November 2022 exact time and information

HomeNews

चंद्र ग्रहण 8 नोव्हेंबर 2022 जाणून घ्या अचूक वेळ व माहिती | Know Lunar Eclipse 8th November 2022 exact time and information

my-portfolio

  2022 या सालातील अंतिम चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ( 8 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी लागत आहे. हे चंद्रग्रहण दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी प

Manoj Dey : DIGITAL STARS EVENT 2023 | डिजिटल स्टार्स इव्हेंट 2023

 

2022 या सालातील अंतिम चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ( 8 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी लागत आहे. हे चंद्रग्रहण दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी या चंद्रग्रहणाची समाप्ती होत आहे. ग्रहणाचा मध्य हा दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी असेल.

मित्रांनो तब्बल 3 तास 41 मिनिटे हे चंद्रग्रहण चालणार आहे. हे ग्रहण भारतातील काही भागात खंडग्रास स्वरूपाचे तर उर्वरित भागात खग्रास या स्वरूपाचे दिसेल. ग्रहणाचे वेध हे सूर्योदयापासून मान्य आहे. म्हणजेच 8 तारखेला मंगळवारी सूर्योदय झाल्यापासून ग्रहणाचे वेध आपण पाळायचे आहेत. कुठपर्यंत तर ग्रहणाचा जो मोक्ष आहे, अर्थात सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटापर्यंत आपल्याला या ग्रहणाचे वेध, अर्थात सुतक पाळावे लागतील. मात्र त्याच ज्या गर्भवती स्त्रीया आहेत, ज्या व्यक्ती आजारी आहेत. वृद्ध व्यक्ती, लहान बालके आहेत अशांनी मात्र सकाळी 11 पासून ते ग्रहांन मोक्षा पर्यंत, म्हणजेच सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत.

हेही वाचा : Viral Video :  वाघानं ओढली Mahindra Xylo  चक्क दातानं…  आनंद महिंद्रा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

लक्षात ठेवा सकाळी 11 पासून ते सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटापर्यंत. या ग्रहण काळामध्ये जो ग्रहणाचा पर्वकाळ आहे किंवा ज्याला पुण्य काळ असे म्हणतात. या पुण्य काळामध्ये आपण जप, तप, पूजा, अनुष्ठान, होम हवन, दान धर्म या गोष्टी नक्की करा. कारण त्याचा अनेक पटींनी अधिक फळ आपल्याला प्राप्त होतं. विशेष करून ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाच्या मंत्र्यांचा जप या पुण्य काळात आपण करू शकता. पुण्य काळ कधी आहे तर आपल्या गावाचा जो सूर्यास्ताचा वेळ आहे. तुमच्या गावामध्ये-शहरामध्ये सूर्य ज्या टायमिंगला मावळतो तर त्या वेळेपासून ते ग्रहण मोक्षा पर्यंत.

ग्रहण मोक्ष 6 वाजून 19 मिनिटे आहे. तुमच्या गावात जर 6 वाजता सूर्य मावळत असेल तर 6 वाजेपासून ते 6 वाजून 19 मिनिटांच्या कालावधीत आपण हे दानधर्म वगैरे करायचा आहे. होम हवन, पूजा, अनुष्ठान करायचे आहे. मंत्राचा जप करायचा आहे. त्याचं फळ खूप चांगले मिळते. आता पाहूया की प्रत्येक राशीवरती या ग्रहणाचा प्रभाव कसा पडेल. तर चार राशींसाठी हे ग्रहण अत्यंत शुभ फलदायक ठरणार आहे. त्या राशी म्हणजे मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ. तर काही राशीसाठी हे जे ग्रहण आहे ते अनिष्ठ फलदायक ठरणार आहे. त्यामध्ये मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशी समावेश आहे. तर काही राशींसाठी हे जे ग्रहण आहे ते मिश्र फलदायक असणार आहे म्हणजेच काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईट सुद्धा होऊ शकते. त्यांच्यामध्ये सिंह, तुला, धनु आणि मीन या 4 राशिंचा समावेश आहे. ज्या 4 राशिंना ग्रहण अनिष्ट फलकदायक असणार आहे ते मेष, वृषभ, कन्या आणि मकर यांनी हे ग्रहण चुकूनही पाहू नये आणि गर्भवती स्त्रियांनी तर अर्थातच या ग्रहणाची छाया सुद्धा स्वतःवर आणि स्वतःच्या बाळावर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर ही होती 8 नोव्हेंबर, मंगळवार रोजीच्या खग्रास चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती.

हेही वाचा : Viral Video: मगरीच्या कचाट्यात सापडलं तर कोणालाही सोडणार नाही! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल…

या ग्रहणास ग्रस्तोदित असं म्हटलेलं आहे याचं कारण असं आहे की चंद्रोदय हा जेव्हा होणार आहे तर चंद्र उगवल्या बरोबर आपणास दिसेल की त्याला ग्रहण लागलेल आहे.  थोडक्यात तो ग्रस्त झालेला आहे जेव्हा तो उदीत होईल जेव्हा तो उगवेल तेव्हा ऑलरेडी त्याला ग्रहण लागलेल आहे आणि म्हणून याला ग्रस्तोदित म्हटले आहे. म्हणजे ग्रहण लागलेला आहे आणि दित म्हणजेच उदित, उगवतो आहे तर असा याचा अर्थ आहे. तेव्हा हे कोणतेही वेगळे चंद्रग्रहण नाही. ज्या प्रकारे सूर्यग्रहण लागलं होतं की तोच प्रकार येथे घडलेला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0