मगरीचे नाव जरी काढले तरी अंगावरती काटा येतो अशीही भली मोठी मगर जर आपल्या समोर आली तर आपल्याला घाम सुटल्याशिवाय राहत नाही. एखादा प्राणी जर सापडला तर
मगरीचे नाव जरी काढले तरी अंगावरती काटा येतो अशीही भली मोठी मगर जर आपल्या समोर आली तर आपल्याला घाम सुटल्याशिवाय राहत नाही. एखादा प्राणी जर सापडला तर मगर त्या प्राण्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहत नाही.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगर पळून जात असल्याचे दिसते. शेवटी मात्र धक्कादायक बाब घडते की आपल्याही डोळ्यात पाणी येते. या व्हिडिओमध्ये नेटकर्यानी कुत्रा सांभाळणाऱ्या व्यक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. लहान असणाऱ्या प्राण्यावर जीवाशी खेळ करणाऱ्या मालकावर नाराजी व्यक्त केली आहे.
वायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक मोठी मगर नदीच्या काठावर पसरलेली असते. तेवढ्यात अचानक एक छोटसं पांढऱ्या रंगाचे कुत्र्याचे पिल्लू उड्या मारत तेथे येते व त्या मगरीच्या दिशेने पळू लागते. खरे पाहता मगर व छोट्या कुत्र्याच्या पिल्लू च्या ताकदीची तुलना आपण करू शकत नाही. पण कुत्र्याच्या पिल्लाचे धाडस मात्र बघण्यासारखे आहे. कुत्र्याचे पिल्लू मगरीच्या दिशेने जाऊन त्या मगरीला पळवून लावते. मगर पळून जाते हे पाहून ते कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्या मगरीला सुद्धा पळवून लावते मात्र दुसऱ्या वेळेस ती मगर माघारी येऊन त्या पिल्लाला आपल्या तोंडात पकडून घेऊन जाते हे पाहून मात्र डोळ्यात पाणी येते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ६० हजार पेक्षा जास्त व्हृयुज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून कुत्र्याच्या पिल्ला बाबत हळहळ व्यक्त केली आहे.
COMMENTS