Viral Video : श्रीलंकेच्या गोलंदाजाची भन्नाट स्टाईल; हटके पण आगळी-वेगळी

Homesports

Viral Video : श्रीलंकेच्या गोलंदाजाची भन्नाट स्टाईल; हटके पण आगळी-वेगळी

my-portfolio

आगळ्या-वेगळ्या गोलंदाजीच्या स्टाईलमुळे सध्या Abu Dhabi T10 League मधील एक गोलंदाज प्रचंड व्हायरल होत आहे. तो गोलंदाज आहे केविन कोथिगोडा. आधी

आगळ्या-वेगळ्या गोलंदाजीच्या स्टाईलमुळे सध्या Abu Dhabi T10 League मधील एक गोलंदाज प्रचंड व्हायरल होत आहे. तो गोलंदाज आहे केविन कोथिगोडा.

आधी धमाकेदार फलंदाजी करतानाचा एका फलंदाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता एका गोलंदाजाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची पद्धत पाहून तुम्ही खरंच थक्क व्हाल आणि विचारात पडला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. Abu Dhabi T10 League मधील खेळाडूंचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा : स्वयंपाक घरात शिरला King Kobra, सर्प मित्राने कसा पकडला किंग कोब्रा पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. या गोलंदाजाचं नाव केविन कोथिगोडा असं असून तो श्रीलंकेमधील रहिवाशी आहे. केविन कोथिगोडा हा एक स्पिनर असून उजव्या हाताने गोलंदाजी करतो. गोलंदाजी करताना केविनचा एक हाथ मागे जातो. एवढंच नाहीतर केविन बऱ्याचदा हटके गोलंदाजीच्या नादात पडला देखील आहे.

आणखी वाचा : Viral Photo : Shweta Tiwari | श्वेता तिवारी हि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्विटर यूजर @PaulRadley ने शेयर केला असून ते पत्रकार आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकजण अशाप्रकारची गोलंदाजी पाहून हैराण आहे. अनेक ट्विटर युजर्स यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, “श्रीलंकेचा इतिहास आहे, अशा पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्यांबाबत”

काही वेगळे काही हटके करणार्या  केविन कोथिगोडा याची गोलंदाजी करण्याची पद्धत आगळी-वेगळी असली तरी, तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याच्या या अनोख्या गोलंदाजीमुळे तो नाह्मी चर्चेत असतो.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    Viral Video :  वाघानं ओढली Mahindra Xylo  चक्क दातानं...  आनंद महिंद्रा व्हिडीओ शेअर करत म्हणाले... - All Viral 2 years ago

    […] आणखी वाचा : Viral Video : श्रीलंकेच्या गोलंदाजाची भन्नाट… […]

DISQUS: 0